Ticker

6/recent/ticker-posts

पीएम- जन धन योजना

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) -

 - ही भारताची एक आर्थिक क्षेत्राची वित्तीय समावेशन योजना आहे ज्याद्वारे,बँक बचत व जमा खाते,प्रदान, जमा करणे विमा व पेन्शन या आर्थिक सेवा एकाच परवडणाऱ्या रितीने हाताळता येतात.
घोषणा - १५ ऑगस्ट २०१४ ला 
सुरूवात - २८ ऑगस्ट २०१४ ला करण्यात आले.

उद्देश - आर्थिक सेवांचा लाभ देशातील गरीब आणि वंचित जनतेपर्यंत पोहोचवणे आहे
१) विशेषतः बँक खाते उघडणे, 
२) बँकिंग सुविधा प्रदान करणे, 
३) आर्थिक साक्षरता वाढवणे, 
४) लोकांना विमा तसेच पेन्शन सेवा उपलब्ध करून देणे 
             एकंदरीत वित्तीय समावेशन हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- DBT च्या माध्यमातून विविध योजनेचा रक्कमेच  हस्तांतरण थेट जन धन खात्यावर करणे 
- भ्रष्टाचार मुक्त वित्तीय समावेशन

पहिला टप्पा -( १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत )

१) बँकिंग सुविधापर्यॅंत वैश्विक पोहोच  

२) ६ महिन्यापर्यंत ५,०००रुपयापर्यंतची अधिकर्ष सुविधा देणारे, 

३) १ लाख रुपयांच्या अपघाती विम्याची सुविधा असणारे 

४) रूपे कार्ड देणारे ,रूपे किसान कार्ड देणारे. 

५) ' वित्तीय साक्षरता कार्यक्रम ' अमलबजावणी करणे

- दुसरा टप्पा ( १५ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१८)

१) ओव्हरड्राफ्ट खात्यामधील बुडालेल्या कर्जासाठी 'पतहमी निधीची उभारणी

२) अपघाती सूक्ष्म विमा - १ लाख रूपयांपर्यंत 

३) असंघटीत क्षेत्रासाठी स्वालंबनसारख्या 'पेन्शन योजना '. 

- तिसरा टप्पा ( १५ ऑगस्ट २०१८ नंतर आतापर्यंत) 

१)  लक्ष्य - प्रत्येक कुटुंबाकडून प्रत्येक अखातेधारक प्रौढाकडे  (Every household to Every Unbanked Adult) 

२) अपघाती सूक्ष्म विमा वाढ - २ लाख रुपयांपर्यंत

३) अधिकर्ष सवलत (Overdraft) वाढ  - १०,००० ₹ पर्यंत (यात २००० ₹ पर्यंत विना शर्त OD) 


- अलिकडील आकडेवारी १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत ५०.०९ कोटी जन धन खाते

Telegram Link


आयोगाचे प्रश्न -   



📘 टेलेग्राम                                                                                                                             📕 YouTube

© all rights are to be reserved to the MPSC Classmate Team  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या