Ticker

6/recent/ticker-posts

बहिष्कृत हितकारिणी सभा (1924)

बहिष्कृत हितकारिणी सभा (1924)

GS 1 मुख्य परीक्षा ( इतिहास)/ पूर्व परीक्षा - 

बहिष्कृत हितकारिणी सभेला २० जुलै २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण 

स्थापना - २० जुलै १९२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 

या सभेच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या ब्रीदवाक्याची सुद्धा शंभरी होत आहे.

या साठी ९ मार्च १९२४ ला दामोदर हॉल, परळ येथे डॉ. आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून सभा घेतली. त्यानुसार २० जुलै १९२४ ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झाली. 

या सभेच्या सदस्यांमध्ये सर चिमणलाल सेटलवाड, मेयर निस्सीम, रुस्तुमजी जीनवाला, जी. के. नरिमन, डॉ. र. पु. परांजपे, बी. जी. खेर, नानाजी मारवाडी, झीनाभाई राठोड, केशव वाघेला यांच्यासह काही चर्मकार, मातंग व महार सदस्यांचा समावेश होता.

बहिष्कृत वर्गाच्या चालू परिस्थितीची माहिती गोळा करून व ती लोक निदर्शनास आणून त्यावर लोकमत तयार करणे, त्याचप्रमाणे सरकारकडून त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांच्या उन्नतीस जरूर त्या सवलती मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणे. बहिष्कृत वर्गात जागृती करणे व त्याप्रीत्यर्थ प्रचारक नेमणे, बहिष्कृत वर्गात त्यांच्या हक्कांची जाणीव उत्पन्न करून ते त्यांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणे. शिक्षणप्रसार करणे, वाचनालये स्थापणे, विद्यार्थी वसतिगृहे काढणे, लायक विद्यार्थ्यांस शिष्यवृत्त्या देणे व देवविणे, समाजजागृतीसाठी कीर्तने किंवा मॅजिक लॅटर्नद्वारे व्याख्याने वगैरेंची व्यवस्था करणे, आर्थिक उन्नतीच्या जरूर त्या योजना व सूचना तयार करून योग्य अधिकाऱ्यास सादर करणे, इ. या सर्व उद्देशांना अनुसरून बहिष्कृत हितकारिणी सभेची वाटचाल नंतरच्या काळात झाली.

‘‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’’ हे बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य आहेे

कार्ये -

अस्पृश्यांना नोकरीत जागा मिळाव्यात यासाठी सभेने प्रयत्न केले. श्री. जाधव यांच्यासाठी केलेले प्रयत्न महत्वाचे आहेत. कु. काशीबाई जाधव या ढोर समाजाच्या मुलीला जे. जे. हॉस्पिटलमध्ये प्रवेश, दरमहा १५ रु. स्कॉलरशिप व नर्सेसच्या बोर्डिंगमध्ये राहण्याची व्यवस्था केली. सभेच्या नेतृत्वाखाली श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळी, कामाठीपुरा पहिली गल्ली, औचितपाडा येथे रात्रीची इंग्रजी व मराठी शाळा सुरू केली.

बहिष्कृत भारतच्या कार्यालयामध्ये बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या रविवारी वादविवाद मंडळाच्या बैठका होत. या बैठकीत ‘रणशिंग नावाचे एक हस्तलिखित मासिक सुरू करण्याचे ठरले होते. ते सुरू झाले की नाही याची माहिती उपलब्ध नाही; परंतु ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्र सुरू केले गेले.

बहिष्कृत हितकारिणी सभेचे वाचनालय मुंबईतील क्लार्क रोडवर होते. या वाचनालयासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: देणगी दिली होती. कोल्हटकर आपला ‘संदेश’ आणि दे. वि. नाईक ‘ब्राह्मण ब्राह्मणेतर’ हे वृत्तपत्र या वाचनालयासाठी मोफत पाठवत होते.

बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाने इतर भागातही सभा स्थापन झाल्या. इंदूर येथे श्रीमंत सवाई यशवंतराव महाराज होळकर यांच्या २१ व्या जन्मदिनाप्रीत्यर्थ त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी बहिष्कृतांची जाहीर सभा भरली. त्या सभेत बहिष्कृत हितकारिणी सभा इंदूर येथे स्थापन करण्याचा निर्णय झाला. मुंबईतील बहिष्कृत हितकारिणी सभेत महिलांचा सहभाग असे, तसाच राधाबाई पंडित आणि अंबुबाई इनामदार यांचा विशेष सहभाग इंदूर येथील सभेच्या कामात असेे.

सभेला ब्रिटिशांचे सहकार्य - 

मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांनी सभेला २५० रु. देणगी दिली. अस्पृश्यांनीही सतत देणग्या दिल्या. बेळगाव येथील अनाथ विद्यार्थी आश्रमास श्रीमंत धर्मवीर राजे लक्ष्मणराव भोसले यांनी ५१ रु. देणगी दिली.

    ज्यांनी-ज्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या कार्यास आर्थिक मदत केली, त्यांच्या मदतीच्या रकमेसह सभेचे सचिव सीताराम शिवतरकर यांनी वेळोवेळी आभारासह प्रसिद्धी दिली आहे. महाडच्या सत्याग्रहासही लोकांनी विशेष देणग्या दिल्या.

महाडचा चवदार तळे सत्याग्रह - 

बहिष्कृत हितकारिणी सभेने महाडचा चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन हे दोन उपक्रम राबवले, त्यांचे पडसाद आजही समाजावर दिसून येतात. माणूस म्हणून हक्क बजावण्यासाठी हे संग्राम झाले. डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांचीही सभा घेतली, त्या सभेत बाबासाहेबांनी स्त्रियांना उद्देशून केलेल्या भाषणाने महिलांमधील स्वाभिमानाला व त्यांच्या अस्मितेला कायमचे जागृत करून त्यांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित केले.

या सत्याग्रहाच्या वेळी ‘आंबेडकर पथका’ची निर्मिती सभेचे व्यवस्थापन करण्यासाठी केली होती. पुढे कालांतराने याचे विस्तृत पातळीवर ‘समता सैनिक दला’त रूपांतर झाले.

जून १९२८ पासून भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. याचे जनरल सेक्रेटरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. बहिष्कृत हितकारिणी सभेने जे वसतिगृह काढले होते, त्याची सर्व जबाबदारी नंतर या मंडळातर्फे पार पाडली गेली. 

इतर सदस्यांची माहिती -

  1. श्री चिमणलाल हरीलाल सेटलवाड-बहिष्कृत हितकारिणी सभेचे अध्यक्ष 
  2. मेयर निस्सिम-उपाध्यक्ष  
  3. रुस्तमजी जिनवाला-उपाध्यक्ष 
  4. जी. के. नरीमन-सॉलिसिटर 
  5. डॉ. आर. पी. परांजपे-सॉलिसिटर 
  6. डॉ. व्ही. पी. चव्हाण-सॉलिसिटर 
  7. बी. जी. खेर-सॉलिसिटर 
  8. Dr.B.R.Ambedkar-व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष 
  9. सीताराम. एन. शिवतरकर-सचिव 

N.T.Jadhav-खजिनदार ( Treasurer) 

Source - (लोकसत्ता, गाठाळ + Wikipedia) 

आयोगाचे प्रश्न - 


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या